मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित गडचिरोली जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी *श्री.अभिषेक कोपुलवार* यांची तर जिल्हा सचिवपदी *श्री.तुषार धंदरे* यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया महासंघाचे संस्थापक *श्री. संदीप मनोरे,* राज्य सचिव *प्रा. तायाप्पा शेंडगे*
गडचिरोली जिल्ह्याचे मार्गदर्शक *श्री.अजिंक्य मडावी श्री.अंकित नरोटे* यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
श्री.अभिषेक कोपुलवार यांची गडचिरोली जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. किशोर पुंगाटी, श्री.प्रविण मेश्राम कार्याध्यक्ष पदी श्री.चंद्रकांत वेलादी सचिवपदी श्री.तुषार धंदरे सहसचिव पदी श्री. पूर्णानंद सोनजाल, कु.वनिता हिचामी खजिनदारपदी श्री.शुभम कोंडे जिल्हा संघटकपदीश्री.मनोज महाका, श्री.निखिल हिचामी, श्री.प्रशांत कवळो, श्री.सुरेंद्र मडावी, श्री.केशव कोवसे यांची निवड झाली आहे. तसेच जिल्हा सदस्य श्रीमती.सौ.प्रियांका वांढरे (रासेकर), श्री. करणसिंग तुलावी, श्री. अनिल हिचामी, श्री. संतोष गैनवार, श्री. सौ.प्रणाली गैनवार, श्री. सुरज मेश्राम, श्री. संतोष पुंगाटी, श्री. कारण पेंदाम,
श्री. देवकुमार हरामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. पंकज मडावी तर जिल्हा प्रसिद्धी सचिव श्री. सरोजित मंडल, कु.मृणाली सराफ यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्हा कार्यकारणी नुकतीच पार पडली.
कार्यकारणीची निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक श्री.अजिंक्य मडावी, श्री.अंकित नरोटे आणि महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगे व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

