मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील मेडाराम, नारायणपूर, पेंटीपाका, झिंगानूर सह इतर गावामध्ये प्रलंबित असलेल्या वन हक्क जमीन बाबतीत *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार व राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी* यांनी प्रत्येक गावात जाऊन गावात सभा घेऊन समस्या जाणून घेतले.
*सिरोंचा तालुक्यातील विविध गावात सभा घेऊन वन हक्क समस्या जाणून घेऊन वन हक्क जमिनीबाबत आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम* यांना माहिती देण्यात आली.
*झिंगानूर, नारायणपूर, मेडाराम* परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित राहून आपल्या समस्या सांगितले.यावेळी *सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक* मोठ्या संख्येने उपस्थित होते.
