मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा : वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित डॉ. सी. व्ही. रमण सायन्स कॉलेज, सिरोंचा येथे महिला अध्ययन व सेवा केंद्र तसेच महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने ९ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त “महिलांचे मूलभूत अधिकार” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. फिरदौसी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून कु. प्रांजली कुलकर्णी (पीएसआय, पोलीस स्टेशन सिरोंचा) उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिलांचे मूलभूत अधिकार, महिलांना मिळणारे कायदेशीर संरक्षण तसेच महिलांनी आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन व संचालन डॉ. नगमा सैय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी निहारिका गोतूरी या विद्यार्थिनीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
