मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* तालुक्यातील टेकमपल्ली येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत शिवकुमार शंकर तोर्रेम कुटुंबाचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे आगीत नष्ट झाली असून कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तात्काळ दखल घेत आपल्या कार्यकर्त्यांमार्फत तोर्रेम कुटुंबाला आर्थिक मदत पाठविली. तसेच त्यांनी दूरध्वनीद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.यावेळी त्यांनी पुढील काळातही आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.आर्थिक मदतीमुळे तोर्रेम कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, नव्याने उभे राहण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार,भाजपचे तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, अभिजित शेंडे जिल्हा सचिव भाजपा, राकेश कोसरे भाजप सोशल मिडिया प्रमुख, प्रमोद भोयर, अजय ठाकरे,चिंन्ना सिडाम,सतीश येल्लूर,सिद्धेश सिडाम आदी उपस्थित होते!

