मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
चैत्र शुक्ल पक्ष नवमी कलियुग वर्ष ५१२८ रोज गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी गुड्डीगुडम येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्रीराम नवमी च्या ओचित्य साधून श्रीराम नवमी व हिंदू संमेलन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आले.
भगवान श्रीराम-सीता माता च्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पूजन करून अक्षता वाहून नवमी कार्यक्रम केल्यानंतर उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात परम पूज्य शंकर महाराज नैताम तसेच प्रमुख वक्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी जिल्हयाचे जिल्हा संघचालक सुरेश गड्डमवार, सरपंच अनिल पेंदाम, माजी सरपंच महेश मडावी, सामाजिक कार्यकर्ते सचिन गणपूरवार उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीते करिता संतोष भुजाडी, चिरंजीव पल्ले,योगेश कोतकोंडावार, शिवकुमार भुजाडी, सतीश तलांडे,राजू कोतकोंडावार, देवाजी भुजाडी, गणेश गावतुरे,चेतन भुजाडी आदींनी सहकार्य केले.यावेळी गावातील महिला पुरुष, युवक,युवती, बालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

