मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील पोचम्मा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा इंदाराम येथे पोचम्मा देवीच्या बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
पोचम्मा देवी बोनालू कार्यक्रमाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून देवीची दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी पोचम्मा देवी कडे प्रार्थना केली.तसेच होणाऱ्या बोनालू कार्यक्रमाला कंकडालवार परिवाराकडून वर्गणीही देण्यात आली आहे.
यावेळी परिसरातील भाविक व स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

