शिवसेना महिला आघाडी तर्फे नगर पालिका मुख्यधिकारी व उपनगराध्यक्ष देण्यात आले निवेदन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- दिनांक २५ मार्च रोज गुरुवारला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुभांगी ठमेकर वर्धा जिल्हाप्रमुख महिला आघाडी व अमित गावंडे उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट विधानसभा यांच्या उपस्थितीत हिंगणघाट नगरपालिका मुख्यधिकारी उरकुडे व उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे यांना स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सौंदर्यीकरणाच्या कामात होत असलेली चालढकलं, कामाच्या प्रगतीमध्ये मंदावलेलीगती याबाबत निवेदन देण्यात आले.
येत्या 14 एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात समाजबांधव व ईतर सामाजिक संघटना साजरी करतात. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य नगर परिषद मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी याबाबतची जबाबदारी स्विकारुन येत्या 10 एप्रिल पर्यंत काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्याधिकारी यांना शिवसेना पक्षातर्फे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी ठमेकर, अमित गावंडे उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट विधानसभा, अमोल देशपांडे युवासेना उपतालुकाप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मंदाकिनी ढाले, पल्लवी सराटे, हेमलता मेश्राम, ललीता कैकाडे, अश्विनी गेडाम, निकीता काळे, अनुष्का जांभुळकर, सुनिता भितघरे, प्रियंका कैकाडे, सोनाली बालपांडे, पुनम काटकर, रोशनी वाघमारे, वैशाली ढाले, विभा कापटे सह असंख्य महिला आघाडी सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.

