मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय श्रीमंत राजे धर्मराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहेरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. अहेरी येथील राजघाट परिसरातील त्यांच्या समाधीस्थळी ज्येष्ठ नागरिक विनोद भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. राजे धर्मराव महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक व दानशूर कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली. समाजातील शिक्षणाच्या प्रसारासाठी तसेच सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.यानंतर दानशूर राजे धर्मराव महाराज चौकातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या राजे धर्मराव महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी धर्मराव शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

