विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्रं 9421856931
भारतीय जनता पार्टी चा 47 वा वर्धापन दिन एटापल्ली तालुका कार्यालयात मोठ्या उत्साहात, संघटनात्मक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद पुल्लूरवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. माननीय श्री. दीपकजी सोनटक्के (तालुका कोषाध्यक्ष) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनाच्या या प्रेरणादायी क्षणी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपा परिवाराने देशसेवेची व संघटन बळकट करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आघाडीचे अध्यक्ष तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्रीमती रेखाताई मोहुर्ले, अशोक पुल्लूरवार, बाबुरावजी गंपावार, दीपकजी फुलसंगे, राकेशजी हिरा, सागर मंडल , मोहन नामेवार, खेळचंद वैरागडे, राकेश बिरमवार, निर्मलाताई कोंडबाततुलवार, सुरेखाताई अडगोपुलवार, संपत पैडाकुलवार, संतोषजी महा, दिलीपजी पुपरेड्डीवर, विजय नल्लावार, प्रीतम मडावी, प्रभाकर कुकटलावर, नवीन जयदेव, बाला, नीरज भट्टाचार्य, गणपतजी नैताम , अद्वितीय उपगन्लावर , अनिकेत मामेडवार, महेश मोहुर्ले , यवन पुलके यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व भाजपा मित्रपरिवार उपस्थित होता.
ध्वजारोहणानंतर तालुका स्तरावर संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी काळातील कार्ययोजना, जनसंपर्क वाढविणे, तसेच पक्षाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवली.
त्यानंतर 47 व्या वर्धापन दिनानिमित्त अन्नदान करण्यात आले आहे.

