सरकारच्या गॅस धोरणा विरोधात संताप.
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800
सविस्त्र माहिती खालील प्रमाणे आहे
राजुरा:- केंद्र व राज्य शासनाच्या गॅस सिलेंडर संदर्भातील धोरणा विरोधात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज राज्य भर गॅस टंचाई च्या विरोधात आंदोलन करण्यात आले असून, राजुरा मध्येही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सोमवार दि, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संविधान चौक राजुरा इथुन तहसील कार्यालय इथपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विजय जुलमे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, या मध्ये आंदोलन करण्यासाठी जोरदार निदर्शने करत, शासनाच्या धोरणा विरोधात संताप व्यक्त केला, जर निवडणुकी मध्ये गॅस सिलेंडरला निवडला असता तर आज किचन मध्ये गॅस सिलेंडर मिळाला असता,” नरेंदर कब मिलेगा सिलेंडर ? “या घोषणा देत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले, गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवन, रोजीरोटी आणि रोजगारावर झालेल्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजुरा येथे या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तसेच विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असून दुकाने बंद पडत आहेत. काही ठिकाणी सिलिंडर उपलब्ध असला तरी त्याची किंमत ४ते ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर काही ठिकाणी सिलिंडरमध्ये पाणी भरलेले आढळले आहे. सरकार वारंवार दावा करत आहे की कोणतेही संकट नाही, परंतु हे पूर्णतः असत्य आहे.
आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
१. गॅस सिलिंडरची होणारी कृत्रिम टंचाई त्वरित थांबवावी.
२. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखावा.
३. २५ दिवसांनंतरच गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी.
४. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
५. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ‘कम्युनिटी किचन’ सुरू करावेत. तसेच, दर २ किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न पुरवावे.
६. परिस्थिती कधी सामान्य होईल, हे सरकारने जाहीर करावे; जेणेकरून सामान्य नागरिक मानसिकदृष्ट्या तयार राहू शकतील.
७. राज्यात अनेक ठिकाणी KYC नसल्याच्या कारणास्तव नागरिकांना गॅस दिला जात नाहीये, अशा नागरिकांना तातडीने गॅस उपलब्ध करून द्यावा.
८. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ‘उज्ज्वला गॅस योजने’अंतर्गत किती लाभार्थ्यांना सिलिंडर दिले आहेत, याचे ऑडिट करावे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सच्चिदानंद रामटेके जिल्हा सदस्य, मुरलीधर ताकसांडे तालुका उपाध्यक्ष, ऋषी रायपुरे उपाध्यक्ष नागोराव पडवेकर तालुका महासचिव, बाळू जुलमे, मारोती रामटेके, प्रभुदास वनकर, शंकर दुर्गे, परशुराम वाघमारे, दिलीप जुलमे, मारोती घागरगुंडे, दिलीप भसारकर, चरणदास झाडे, विठ्ठल धोटे, शंकर झाडे, कवडूजी वाघमारे, गौतम देवगळे, तसेच इतर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते,

