सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर दि. ८ ऑक्टोंबर:- नवरात्रच्या पावन पर्वावर न्यु बाल शारदोत्सव महिला मंडळ, शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याचे शनिवारला शिवाजी वॉर्ड येथे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष नगरपरिषद बल्लारपूर, विश्वजितसिंह चंदेल भाजपा नेते, कृष्णासिंह चंदेल, जुम्मन रिझवी भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, भरतसिंह ठाकुर भाजपा नेते, इंजि.देवेंद्र वाटकर भाजपा शहर सचिव व जिल्हाध्यक्ष सुशिक्षित बेरोजगार अभियंता असोसिएशन चंद्रपूर यांची उपस्थिती होती.
नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रॅम्प वॉक, ग्रुप डान्स अश्या प्रकारच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कार्तिक रामटेके, तृप्ती मुळे, आकाश चौधरी, अझहर रिझवी, रेवण शास्त्रकार, चेतना रणदिवे व शारदा मंडळच्या समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

