Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी;

Madhukar gongale by Madhukar gongale
April 20, 2026
in Uncategorized
0 0
0
गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी;
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॉ. सुजिता वाडीवे, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी कुरखेडा यांना न्याय देण्याची मागणी.

मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*!महिला आघाडी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली.!*

गडचिरोली, दि.20 एप्रिल 2026: गडचिरोली येथील कार्यरत असलेले विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यपद्धती व वर्तनाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्या असून, याबाबत तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला मिळालेल्या तक्रारीनुसार डॉ. सुजिता वाडीवे यांना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी व तालुका हिवताप अधिकारी कुरखेडा यांना भ्रष्टाचार करण्यासाठी प्रवृत्त करणे विनयभंग, लैंगिक छळ, मानसिक छळ,जातीवाचक अपमान,खोटी माहिती व बनावट कागदपत्रे सादर करणे व इत्यादी अन्यायकारक वागणूक मिळाल्याचा तक्रार करण्यात आला आहे. तशी रीतसर तक्रार डॉ सुजिता वाडीवे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना केली आहे या प्रकरणात अधिकारांचा दुरुपयोग, पक्षपाती निर्णयप्रक्रिया व शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून, यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.? प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी कुरखेडा डॉ. सुजिता वाडिवे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील हिवताप नियंत्रणासाठी कीटकनाशके, औषधी प्रयोगशाळा,साहित्य खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या मर्जीतील विशिष्ट पुरवठादारास लाभ मिळवून देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली व चुकीच्या पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबविले प्रकारात भ्रष्टाचार केला व त्यांनी सतत फोन करून मानसिक छळ सुरू केला. व धमक्या दिला तसेच महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियमाचे चे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला. सदर विषयाची सखोल चौकशी करून जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांच्यावर कारवाई करावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आधीच डॉ सुजिता वाडीवे यांनी केली आहे. परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली (महिला आघाडी) यांच्या वतीने या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याचीही मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश महिला आघाडी यांनी केली आहे.तसेच संघटनेच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, दोष सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाने करावी.
जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर हा प्रश्न राज्य मानवाधिकार आयोग व राज्य महिला आयोग तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात येईल, तसेच लोकशाही मार्गाने लवकरच जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
सदर विषयाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मनीषा पाटणकर – म्हैसकर (acs -home ) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या तक्रार निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी जाहेदा शेख कोशाध्यक्ष,स्नेहा मेश्राम शहर अध्यक्ष भूषणा खेडेकर शहर उपाध्यक्ष राणी गोपशेट्टीवर शहर सचिव उपस्थित होते.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हा गडचिरोली चे वतीने तात्काळ संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पदावरून काढून निपक्ष चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

मामा तलाव परिसरातील जीर्णोद्धार गणेश मंदिराच्या नूतनीकरण करिता अख्खे गाव सरसावले.

Next Post

एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह 14.90 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह 14.90 लाखांचा मुद्देमाल जप्त.

एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह 14.90 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In