✒️वैजापूर तालुका प्रतिनिधी
वैजापूर:- तालुक्यातील शिऊर बंगला, व तलवाडा या ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य क्रांतीकारी जनरल कामगार युनियन ची शाखा बांधणी व कामगारांच्या कल्याणकारी योजनेची माहिती संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस शेकडो स्थानिक कामगारांनी उस्फुर्त पणे प्रतिसाद देऊन संघटनेचे सभासदत्व स्वीकारून वैजापूर तालुक्यात गावागावत महाराष्ट्र राज्य क्रांतीकारी जनरल कामगार युनियन संघटनेची शाखा उभार्णयाचा निर्णय घेतला या वेळी कामगारांना विविध योजनेची माहिती बाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप म्हस्के यांनी मार्गदर्शन केले तर या बैठकीस प्रदेश संघटक गंगाधर जाधव, जिल्हाअध्यक्ष अशोक जाधव, वैजापूर ता.अध्यक्ष गजानन मगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भागीनाथजी मगर, तलवाडा उपसरपंच दादाभाऊ मगर, ग्रा. प. सदस्य आसिफ शेख, तसेच शिऊर बंगला ग्रा. प. सदस्य बाळा पाटील जाधव, ग्रा. प. सदस्य सुनिल खांडगैरे, अकबरभाई, काशिनाथ महाराज, व कामगार ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348