✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी कॉलेज समोरील उड्डाण पुलावर घडली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुभम रामगोपाल पांडे वय २५, रा. महालक्ष्मीनगर, अंबड असे मयत युवकाचे नाव आहे.
तेजस भिकाजी राणे वय २९, रा. कामटवाडे याने पंचवटी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम हा एमएच १५ एफपी २२९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी दि.८ सायंकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान, उड्डाण पुलावरून जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनचालकाने त्याच्याकडील वाहन भरधाव चालवत शुभमच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवर बसलेला शुभम गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तेजस राणे यास दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

