राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- तालुक्यातील दरुर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दरुर येथे भरदिवसा एकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने गोंडपिपरी तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे. किसन वराते असे मृताचे नाव आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील महाराष्ट्र आणी तेलंगणाच्या सिमेवर लागून असलेल्या दरूर येथे काही जुन्या वादातून चक्क खून झाल्याने गोंडपीपरी तालुक्यात भितीचे वातावरण आहे आज सकाळी मृतक किसन वराते आणी आरोपी मोरेश्वर भोयर यांचा शाब्दिक वादावादी झाली. याचे काही क्षणातच तो शाब्दिक वाद हा थराथरक रुप घेऊन खूणात रुपांतर झाला दरूर येथील मोरेश्वर भोयर यांनी किसन वराते यांचा पोटावर सतुराने जबरदस्त वार केल्याने वराते यांच्या पोटातील आतळी बहार निघाल्या अति रक्स्त्राव झाल्याने त्याना चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले, नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
ही माहीती गोंडपिपरी पोलिस स्टेशनला प्राप्त होतच घटनास्थळी पोलिस निरीक्षक जिवन राजगुरू आपल्या पोलिस कर्मचाऱ्या बरोबर आले. घटनास्थाळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत. मात्र दिवसा ढवळ्या होत असलेला हत्येचा थरारक प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी जमली होती.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348