युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
99 23 29 64 42
नागपूर:- जिल्हातील मोवाड येथील मागासवर्गीय पंचशील महिला मंडळाच्या वतीने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन पंचशील बौध्द विहार मोवाड येथे महिला मंडळच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला मंडळच्या अध्यक्ष लिलाबाई गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी या दिनी लाखो दलीत वंचित समाजाला बौध्द धम्माची दीक्षा नभुतो नभविष्य अशी क्रांती केली. त्यामुळे हा दिवस बौध्द बांधवांसाठी खऱ्या अर्थाने जाती, अंधश्रद्धा, गुलामी, लाचारी पासून मुक्तीचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस दर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच सामूहिक बूद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमातला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता महिला मंडळच्या सदस्य शोभाबाई पाटिल, शारदा फुसे, लिलाबाई बागडे, चंद्रकला बागडे, उषा गजभिये, नेहा गजभिये, रेखा गजभिये, रमा रक्षे, कल्याण सहारे, संगीता बागडे, सुवर्णा सहारे, सविता काठाने, सोनू गजभिये, पायल गजभिये व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

