Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

बॉटनिकल गार्डनचे काम सर्वांच्या समन्वयातून वेळेत पूर्ण करा; पालकमंत्र्यांनी घेतला कामकाजाच्या आढावा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 14, 2022
in मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बॉटनिकल गार्डनचे काम सर्वांच्या समन्वयातून वेळेत पूर्ण करा; पालकमंत्र्यांनी घेतला कामकाजाच्या आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर,दि.14 ऑक्टोबर:- चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी जैव विविधता उद्यान (बॉटनिकल गार्डन) हे चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव राहणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी म्‍हणजे 25 डिसेंबरला या उद्यानाचे लोकार्पण करायचे आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयातून उत्तोमत्तोम काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

बॉटनिकल गार्डन येथे कामकाजाच्या प्रगतीचा ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक आणि वनबल प्रमुख डॉ. वाय.एल.पी राव, वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मध्यचांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार, चंदनसिंग चंदेल आदी उपस्थित होते.

देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन चंद्रपूर येथे साकार होत असल्‍याने वनसंपदा व वनेत्तर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी या गार्डनला देश-विदेशातील पर्यटक भेट देतील, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कोणतेही काम जबरदस्तीने करू नका. एकमेकांच्या समन्वयातून काम वेळेत होणे गरजेचे आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलू नका. बॉटनिकल गार्डनेचे काम एकदम उत्तम झाले पाहिजे. काम करणारे व्यक्तीसुध्दा उत्कृष्टच असायला हवीत.

वन विभागाने येथील कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. तसेच कोणत्या यंत्रणेकडून कामात चालढकल होत आहे, त्याबाबत आपल्याला अवगत करावे. येथील प्रत्येक गोष्ट मजबुत आणि दिसायला आकर्षक असली पाहिजे. साईनेजेस नाविन्यपूर्ण करा. तसेच रेस्टॉरंटसह चांगल्या दर्जाचे आईस्क्रीम / कुल्फी, नारळाचे पाणी, ज्युस, कोल्ड्रींक्स आदींचे सुध्दा स्टॉल लावण्याचे नियोजन करा. पार्किंग व्यवस्था अतिशय चांगली असली पाहिजे. नाविन्यपूर्ण लेझर शो, 15 – 20 सेल्फी पॉईंट्स आदींचे नियोजन करा. बॉटनिकल गार्डनमध्ये ज्या गोष्टी शोभा वाढविण्यासाठी आहेत, त्या सर्व गोष्टींची पुर्तता करून घ्यावी. निधीची कमतरता पडणार नाही. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये हे उद्यान तयार होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्लॅनेटोरीयम, सोलर एनर्जी पार्क, अंडरग्राऊंड म्युझियम, बटरफ्लाय गार्डन, सायन्स सेंटर, कॅफेटेरीया, प्रशासन इमारत, प्रदर्शन बिल्डींग, इंटरन्स प्लाझा, फिश ॲक्वेरीयम, सायन्स पार्क, रेस्टॉरंट आदी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तत्पुर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. बैठकीला संबंधित यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

संगमनेर शहर अतिक्रमणाच्या विखाळ्यात, नगर पालिकेची अतिक्रमण हटावची धडक कारवाई.

Next Post

नागपूर जिल्हातील कळमेश्वर येथे त्रिरत्न बुद्ध विहार मध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर जिल्हातील कळमेश्वर येथे त्रिरत्न बुद्ध विहार मध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

नागपूर जिल्हातील कळमेश्वर येथे त्रिरत्न बुद्ध विहार मध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In