युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
9923 29 64 42
नागपूर:- जिल्हातील कळमेश्वर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिनांक 14 ऑक्टोंबर शुक्रवारला सकाळी नऊ वाजता झेंडावंदन होऊन बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांवर तत्वज्ञानावर बौद्ध उपासक आणि उपासकाने प्रकाश टाकला. यावेळी अध्यक्ष पदावरून राजेंद्र ढवळे यांनी बौद्ध उपासक आणि उपाशी का यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी गर्जना करून बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली.
त्याचप्रमाणे आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून जनजागृती करावी असे उद्गार राजेंद्र ढवळे यांनी काढले. यावेळी राहुल वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या. यात शरद कुमार गायकवाड, राजेश श्रीखंडे, प्रमोद ढवळे, राहुल वानखेडे, मीनाताई ढवळे, प्रकाश ठाकरे, लक्ष्मण गौरखेडे, परसराम तभाने, निवृत्त कळमकर त्याचप्रमाणे महिला मंडळाचे अध्यक्ष शीलाताई गौरखेडे जयमाला ताई तबाने, हिराबाई बागडे, सुशीलाबाई बागडे व शहरातील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

