संदिप पोडे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी.
सौ.हनिशा दुधे, बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
बल्लारपूर:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचा धोका वाढत असल्यामुळे नागरिकात भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात बिबट्याचा आणि इतर जंगली प्राण्यांचा वावर अनेक स्थिकानी दिसून येत आहे त्यामुळे विसापूर पावर हाऊसमध्ये स्थित असलेली प्राथमिक शाळा विसापूर मध्ये स्थानातरित करण्यात यावी. अशी मागणी संदिप पोडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
आशिष देवातळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांचा मार्गदर्शनात संदीप पोडे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांची गट विकास अधिकारी यांच्याकडे जंगली प्राण्यांच्या धोक्यामुळे विसापूर पॉवर- हाऊस मध्ये स्थित असलेलली प्राथमिक शाळा विसापूर येथे स्थानंतर करण्याची मागणी केली आहे. काही दिवसापासून बघत आहात कि आजचा दैनंदिन जीवनात जंगली प्राण्याची संख्या वाढल्यामुळे गाव वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना देखील जंगली प्राण्यांमुळे धोका निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसा अगोदरच विसापूर मध्ये बिबट्यांनी (वाघ) धुमाकूळ घातलेला आपण बघितला. कित्येक पाळीव प्राण्याने नागरीकावर हल्ला देखील केला. काही प्राण्यांना वन विभागाने जेरबंद देखील केले. परंतु अजून दुसरे प्राणी देखील तिथे वास्त्याव्य करीत आहे. त्यामुळे नागरिकाच्या आणि विद्धार्थाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अजून पण बिबट्याचे दर्शन परिसरातील नागरिकांना होत आहे. हि सर्व बाब लक्षात घेऊन पावर हाऊसमध्ये स्थित असलेली प्राथमिक शाळा विसापूर मध्ये स्थानांतरीत करणे अगत्याचे झाले आहे.
विसापूर येथील वॉर्ड.क्र. 5 मध्ये वाघाचे दर्शन रोज नागरिकांना होत आहे. रोज विसापूर मधील नागरिकांचा घरी येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करत आहे. दिनांक 8 ऑक्टोंबर ला सुमारे 7.15 वाजताच्या सुमारास विकास पाल यांचा घरी येऊन बिबट्याने बकरी वरती हल्ला केला व ठार केले. नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातवावरण पसरले आहे. नागरिकांना जीवाचा धोका असून. पेपर मिल मजदूर देखील आपला जीव धोक्यात घालून कामाला जान येन करत आहे. त्यामुळे आम्ही वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी केली आहे. लवकरच आम्ही बिबट्याला जेरबंद करू अशे आश्वासण देखील वनविभागणे दिलेले आहे. याची माहिती मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनां दिलेली आहे व आशिष देवळते यांना दिलेली आहे. संदीप श्रीहरी पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांचा मागणीकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना माहिती दिली असल्यामुळे मागणीली यश येईल अशीच अशा नागरिकांना लागली आहे. आशिष भाऊ देवतळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा समस्या दूर करण्याचे आश्वासन दिलेले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348