राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी:- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना गोंडपिंपरी शहराला तीन कोटी रुपये निधीची मागणी मान्य झाली होती. पण काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि गोंडपिपरी शहरातील विकास कामासाठी मिळालेल्या निधीला ब्रेक लागला आहे. शहरातील विकास कामाला घर घर लागली.
महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आली असतानाच आता गोंडपिपरी शहरातील होणाऱ्या विकास कामांना सुद्धा ब्रेक लागला आहे. त्यामुळे शहरातील जनतेला सत्ताधारी सरकारने वाऱ्यावर तर सोडलं नाही ना असे प्रश्न निर्माण झाले आहे.
आज गोंडपिपरी शहरात रस्ते, पिण्याचे पाणी आणि इतर अनेक मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहे. यासाठी नवीन सरकारने निधी न दिल्यामुळे शहरातील नागरिकांना आणखी काही दिवस खड्ड्यांच्या रस्त्यावरुनच प्रवास करावा लागणार आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निधी अभावी अनेक प्रोजेक्ट धूळ खात पडून आहे. त्यामुळे गोंडपिपरी शहरातील अनेक नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक दिवसापासून चंद्रपूर जिल्हातील पालकमंत्र्याची सरकारने घोषणा केली नव्हती. तसेच ते गोंडपीपरी शहरातील विकास कामाचा निधी विषयावर कुठलीच बैठक झाली नाही. गोंडपिपरी शहरातील नागरिकांना अनेक प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री याची भेट घेऊन निवेदन दिलं. त्यात शहरातील विकास कामाला लागलेला ब्रेक त्यांच्या ध्यानात आणून देत शहराला विकास निधी देण्यात यावे तसेच शहराचा विकास व्हावे यानिमित्त गोंडपिंपरी नगर पंचायतचे काँग्रेस नगरसेवक हे पालकमंत्रीच्या भेट घेतली होती. या भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले होते.
सचिन चिंतावार, पाणीपुरवठा सभापती न. प गोंडपिपरी
मी गोंडपिपरी शहरातील विकास कामाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. ही राजकीय भेट नव्हती ती गोंडपिपरी गावातील विकासाच्या निमित्त भेट होती. पण काही पत्रकार तसेच काही पुढारी या विषयाला वेगळ्या स्वरूपात दाखवून माझ्या सारख्या निष्ठावान नगरसेवकाची बदनामी करण्याचा काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. त्या सर्व लोकांना मी माझ्या विकास कार्याचा माध्यमातून उत्तर देणार आहे. त्याचे पितळ उघडे पडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. ज्यो पर्यंत गोंडपिपरी शहरातील विकास होणार नाही तो पर्यंत की लढत राहणार आहे. त्यात आपण सर्वांनी सोबत येऊन शहरातील विकास कामाला गती देण्यात समर्थन करावे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348