✒️महाराष्ट्र संदेश क्राईम रिपोर्टर
झारखंड:- मधील एका गावातून मन हेलावणारी संतापजनक घटना समोर आली आहे. परीक्षेत कॉपी करत असल्याच्या संशयातून एका शाळेतील शिक्षकेने एका विद्यार्थिनीने कपडे उतरवल्याने ती विद्यार्थिनी घरी जाताच स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारखंडमधील जमशेदपूरमध्ये घडली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच संताप पसरला आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर रित्या जळाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला मेडिकल मध्ये पाठवण्यात आले आहे.
जमशेदपूरमधील छायानगरमध्ये राहणारी पीडित मुलगी साकची येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. सध्या शाळेत परीक्षा सुरु आहे. परीक्षेवेळी पीडित मुलगी कॉपी करत असल्याचा शिक्षिकेला संशय आला. त्यानंतर शिक्षिकेने हा भयंकर प्रकार केला. या प्रकारामुळे विद्यार्थिनी पुर्णत बेजरली आणि घरी गेल्यावर तिने स्वतःला आग लावून पेटवून घेतल.
विद्यार्थिनी नववीत शिकते.
जमशेदपूरमधील छायानगरमध्ये राहणारी पीडित मुलगी साकची येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. सध्या शाळेत परीक्षा सुरु आहे. परिक्षेवेळी पीडित मुलगी कॉपी करत असल्याचा शिक्षिकेला संशय आला.
शिक्षिकेने सर्वांसमोर उतरवले कपडे.
संशयातून शिक्षिकेने मुलीला वर्गात सर्वांसमोर कपडे उतरवायला सांगितले आणि मारहाण केली. यामुळे मानसिक तणावात आलेल्या मुलीने घरी जाऊन स्वतःला पेटवून घेतले, अशी माहिती मुलीने पोलीस जबाबात दिली आहे. आपण कोणतीही कॉपी केली नसल्याचे मुलीने सांगितले.
मुलीची प्रकृती चिंताजनक
या घटनेत मुलगी 80 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे. संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेचा तपास सितारामडेरा पोलीस करत आहेत.