✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार मधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांच्या बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्हात भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल नुसतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातच भाजपच्या मानहानीकारक स्थिती दिसून आली आहे. 13 पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झाले आहेत. मात्र, शिंदे गटाचा एक उपसभापती झाला आहे.13 पंचायत समिती पैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.
नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी,उमरेड, मौदा, कुही, भिवापुर या ठिकाणी कॉग्रेसचे सभापती झाले आहेत. तर, नरखेड, काटोल, हिंगणामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे सभापती झाले आहेत. तर शिंदे गटाचाही रामटेक पंचायत समितीवर एक सभापती झालेला आहे. फक्त रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपचे उपसभापती झालेले आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348