सर्वं बेरोजगार युवा व महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन.
पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
पुणे:- जिल्हातील कोंढवा खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि हाजी फिरोज शेख संस्थापक अध्यक्ष ऑल कोंढवा सोशल फाउंडेशनच्या मार्फत ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र दिनानिमित्त कोंढवा खुर्द मधील बेरोजगार युवक युवतींन साठी भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक 18 ऑक्टोबर 2022 सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत. स्थळ वेलकम हॉल शितल पेट्रोल पंप समोर कोंढवा खुर्द येथे या भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी या महोत्सवात सर्वांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात कमी शिकलेले लोकांसाठी पण खूप नोकरीचे संधी आहेत. तसेच शिकलेले युवकांसाठी पण भरपूर संधी आहेत. ज्या महिला घरातून बाहेर जाऊन काम करू शकत नाही व कमी शिकलेले आहे त्यासाठी पण घरातून काम करण्याची नोकरीची संधी आहेत म्हणजे कुठली महिलांना शिवणकाम येत असेल तर ती त्या शिवणकामापासून दर महिना पाच ते पंधरा हजार पर्यंत कमवू शकतात. कुणी कमी शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना टेली कॉलिंग मध्ये व इतर पॅकर मध्ये 8000 ते 17000 पर्यंत प्रति महिना कमवू शकतात.
नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि हाजी फिरोझ यांचा उद्देश एकच आहे की माझ्या प्रभागा मधील सर्व युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी हे रोजगार महोत्सवाचे आयोजन केले आहे. तरी सर्व युवक युवकांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि हाजी फिरोज शेख यांनी केले आहे.
पण काही लोक आपली सामाजिक मानवधर्म निभवत गरीब, शेतकरी, मजूर, कामगार युवा, तरुण, तरुणी यांच्यासाठी दिवस रात्र तळमळीने कार्य करत असतात त्या पैकीच एक असलेले नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि हाजी फिरोज शेख हे दाम्पत्य आपल्या फाउंडेशनच्या वतीने अनेक युवसाठी आणि परिसरातील नागरिकासाठी जनकल्याणकारी कामे करत आहे. अनेक युवांना यांच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. आणि पुढे हे प्रत्येक युवांना रोजगार मिळेल असे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते परिसरात लोकसेवक म्हणून चर्चिले गेले आहे.