वैशाली गायकवाड, उपसंपादक
पुणे:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेमिके समोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादळले असून अनेक चर्चा सुरू आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर ही धक्कादायक घटना घडली आहे. साकीब लतीफ इनामदार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मृत प्रियकर आणि त्याची प्रेमिका हे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी प्रेमात नेहमी सोबत राहण्याच्या कसमा घेतल्या होत्या. पण रविवारी ता. १६ सकाळी साडेदहा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले. तेथे दोघांमध्ये लग्नावरुन शाब्दिक वादावादी झाली. प्रेयसीचे लग्न जमल्यानंतर त्या दोघांची शेवटची भेट होती. काही दिवसांनीच प्रेयसीचा विवाह होणार होता. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे. मी जगून तरी काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला. हवेली पोलिस ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवेली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
