Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बीड जिल्हात शेत- शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी आ. संदीप क्षीरसागरांचा शेतकर्‍यांना धीर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 18, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बीड जिल्हात शेत- शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी आ. संदीप क्षीरसागरांचा शेतकर्‍यांना धीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महसूल, कृषी विभागाची संयुक्त बैठक; वीज कोसळून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला आर्थिक मदत

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- यावर्षी संपूर्ण जिल्हात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसह जिवीत हानीचेही प्रकार घडत आहेत. अशात हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह जनतेला धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आ.संदीप क्षीरसागर सध्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देताना तसेच शासन दरबारी पाठपुओरावा करताना दिसून येत आहेत. यातूनच सोमवार (दि.१७) रोजी तहसील कार्यालय येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल व कृषीसह विविध विभागांची बैठक घेऊन, बांधावर जाऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले‌. तसेच दि.११ ऑक्टोबर रोजी मोहनगिरवाडी येथील वीज कोसळून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आर्थिक मदत व कुटूंबीयांचे सांत्वन केले.


जिल्हाभरात सातत्याने अतिवृष्टी सुरूच असून यामुळे शेती व शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.१७) रोजी तहसील कार्यालय येथे महसूल, कृषी, पंचायत समिती, विमा कंपनी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत, तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून प्रत्येक गावामध्ये शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सरसकट शेती, शेतपिकांचे व जनावरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करा अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीस संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह सर्व सज्जाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक उपस्थित होते. सोबतच अतिवृष्टीने काही ठिकाणी जिवीत हानीही झाली आहे. त्यातीलच, बीड तालुक्यात असणार्‍या बोरफडी ग्रामपंचायत अंतर्गत मोहणगिरवाडी येथील कै.मोहोरबाई राजेंद्र जाधव यांचा दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला होता. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सोमवार (दि.१७) रोजी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच तातडीने पाठपुरावा करत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून दिली जाणारी आर्थिक मदत एकूण ४ लाख रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द केला. झालेल्या व होत असलेल्या घटना अत्यंत वाईट आणि दुखःद आहेत परंतु या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपण कायम शेतकर्‍यांच्या सोबत असल्याचा विश्वासही आ.संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.

Previous Post

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

Next Post

पुणे: अस काय झाल की, प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत केली आत्महत्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: अस काय झाल की, प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत केली आत्महत्या.

पुणे: अस काय झाल की, प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत केली आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In