विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहता:- परतीच्या पावसाचा फटका संपूर्ण राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील काही भागालाही बसला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. राहता तालुक्यातही तुफान पाऊस झाल्याने अस्तगाव येथे रस्त्यावर पूरजन्य परस्थिती निर्माण झाली होती. या मुळे अस्तगावातील जनजीवन ठप्प होऊन विस्कळित झाले आहे.
ऐन दिवाळीच्या काळात मुसळधार पाऊस येत असल्याने, ही दिवाळी पावसाने धूनार तर नाही अशी भीती नागरिकात पसरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून या राहता तालुक्यातील अस्तगाव मध्ये पावसाने थैमान घातले असून काल रात्री चार तास मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे अस्तगाव बाजार तळावर गुडघ्या एवढे पाणी साठले गेले आहे. सर्व रस्ता बंद झाले आहेत, रस्त्यावर त जास्त प्रमाणात पाणी साठले गेले आहेत. जनावरांसाठी शेतामधून चारा घरी आणणाऱ्या शेतकऱ्यांना चारा वाहतूक करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे व सोयाबीन व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
बाजार तळावरती जे हात गाडा लावून व्यवसाय करणारे भाजीपाला विकणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणची ओढे नाले गच्च भरले असून स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे एक तर दिवाळी तोंडावर येवून ठेपली असताना मोलमजुरी करणाऱ्या बांधवांना हा एक मोठा प्रश्न पडला आहे काम भेटल कसे आता. काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी देखील शिरले आहे दुकादारांकडून या नैसर्गिक आपत्तीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या कडे दुर्लक्ष करू नये या मध्ये ज्याही नागरिकाचे नुकसान झाले आहे त्यांना सरकार कडून नक्की मदत मिळावी आशी मागणी नागिकांमधून होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

