राजेंद्र झाडे उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गोंडपिपरी:- धाबा- हिवरा रस्त्याची अंत्यंत दयनिय अवस्था पाहून दि. १८ ऑक्टोंबर रोजी भाजपा आणि भाजयुमो शाखा धाबाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तहसिलदारांच्या मध्यस्थीने अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम क्र.2 चंद्रपूर ह्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ह्या रस्त्याचे काम 1 नोव्हेंबर पासुन सुरू करून चार महिन्यात रस्ता रहदारसाठी खुला करण्यात येणार आहे.
श्री. संत परमहंस कोंडय्या महाराज धाबा येथिल सभागृहात माजी आमदार ॲड. संजय धोटे, अधिक्षक अभियंता साखरवाडे, कार्यकारी अभियंता श्री. भास्करवार, उपअभियंता वैद्य, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, स्वप्नील अनमुलवार, निलेश पुलगमकर सरपंच, नंदाताई घोगरे सरपंच धाबा, उपसरपंच हिराचंद कंदिकुरवार, माजी उपसभापती अरुण कोडापे, सुशील ढोकटे ठाणेदार धाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कंत्राटदारा सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी दि. १९ ऑक्टोबर पासून गोंडपिपरी-घाबा-हिवरा रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आलेले असून दिवाळी नंतर लगेच नव्याने कामाला सुरवात करुण एप्रिल २०२३ पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले ह्यावेळी आंदोलक संजय येलमुले, राजेंद्र गोहणे, परशुराम कुबडे, आशिष मामीडपेल्लीवार, अनिसा शेख, रोशनी अनमुलवार, कांचन गरपल्लीवार, समता कोपावार, हरिश घोगरे, सुरज भस्की, विठ्ठल चनकापुरे, निखील चंदनगीरीवार, अनिकेत नामेवार, अखिल चंदनगीरीवार, रितीक हिवरकर, सुरज फरकडे, उद्धव हिवरकर, वासुदेव हिवरकर,रितेश पिपरे, सत्तार शेख, इत्यादी भा.ज.पा. वं भा. ज. यु. मो. धाबा येथिल कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348