देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- सी.बी.एस.ई. बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेतील १२१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, सर्व विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले व शाळेच्या निकाल १०० टक्के लागला आहे.
स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी शाळेतील ओम उमेकरने ९७.०४ टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळविला साहिल वर्गणे ९७.०० टक्के घेऊन व्दितीय आला, श्रेयसी खोब्रागडे हिने ९६.०४ टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला तर कार्तीक राणेकरने ९६.०२ टक्के घेत शाळेतुन चौथा क्रमांक पटकावला आहे.
सी.बी.एस.ई. दहावीचा निकाल लागल्यावर स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका व प्राचार्यांना दिले. स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी नागपूरच्या प्राचार्या केतकी शेंद्रे यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनभरून कौतुक केले, व भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.