नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका सहसचिव यांचा अदभुत उपक्रम.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका सहसचिव नितीन जयपूरकर यांनी वाढदिवसानिमित्य एकल वापर प्लास्टिक बंदी व कचर्याचे संकलन बाबत जनजागृती पत्रक वाटून वाढदिवस साजरा केला. यापूर्वी त्यांनी वडाचे व इतर प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून वाढदिवस साजरा केला होता. राजुरा शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी व कचर्याचे संकलन बाबत जनजागृती व्हावी याकरिता स्वतः पत्रक छापून घरोघरी वाटप केले. तसेच नगर परिषदच्या घंटागाडी सोबत फिरून नागरिकांना या विषयीची माहिती देऊन जनजागृती केली.
राजुरा नगर परिषद द्वारे मोठया प्रमाणात ही जनजागृती नियमितपणे केली जातच आहे. परंतु एक नागरिक म्ह्णून आपलेही काही कर्तव्य आहे, आपणही शक्य त्या प्रकारे या महत्वाच्या विषयांची जनजागृती केली पाहिजेत असा संकल्प नितीन यांनी केला आहे. जैवविविधतेवर होणारा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा हा संपूर्ण पृथ्वी समोरचा फार मोठा प्रश्न आहे. असा कचरा टाकणाऱ्या व्यक्ती भावी पिढ्यांचे नुकसान करीत आहे. या कचऱ्यामुळे पृथ्वीवरचे पूर्ण पर्यावरण चक्र बिघडते, जमीन नापीक आणि धोकादायक बनते आणि प्रदूषण वाढते. जैवविघटनयोग्य बायोडीग्रेडेबल व नॉन बायोडिग्रेडेबल कचऱ्याची माहिती, प्लास्टिक ऐवजी कोणत्या वस्तू वापरल्या पाहिजेत, काय वापरावे, काय वापरू नये याविषयी सुद्धा या पत्रकामधून जनजागृती करण्यात आली आहे.
जयपूरकर यांना वडाचे झाड वृक्षारोपणचा छंद आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वृक्षाची लागवड केली आहे. केवळ लागवड करून ती झाड सोडून न देता त्यांची योग्यरित्या जोपासना सुद्धा त्यांनी केली आहे. त्यांच्या या कार्यात कुटुंबाची साथ मात्र नेहमीच असते. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीने लोक वाढदिवस साजरे करतात. परंतु नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सभासदांनी मात्र सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील विविध विषयांवरती जनजागृती , मानवता विकास अंतर्गत गरजूना मदत , पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, बेबीकिट वाटप, छत्री, कपडे, शालेय साहित्य, कुंडी, वृक्षवितरण, भोजनदान असे नानाविध उपक्रम केवळ स्वखर्चातून राबविले आहेत. आदिवासी गुड्यांवरील दीपोत्सव हा नित्यनेमाने होणारा उपक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दिवाळी, होळी साजरी करणे बाबत जनजागृती आदी विषयासह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कार्य सुरू आहे.
यावेळी पत्रक वाटप करताना बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विजयकुमार जांभुळकर, नागपूर विभाग अध्यक्ष, अजय बतकमवार, माजी सिनेट सदस्य, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नितीन जयपूरकर, तालुका सह सचिव, मंजुषा जयपूरकर, तालुका संघटीका, बबलू चव्हाण, चंद्रपूर जिल्हा युवा सचिव, संतोषी सरकार, राजुरा तालुका युवती प्रमुख, सुवर्णा बेले, पुनम बेले, पंकज बाराहाते आदीची प्रामुख्याने उपस्थित होती. नगर परिषद राजुरा च्या घंटागाडी मार्फत हे जनजागृती पत्रक नागरिकांना वितरित करण्यात सहकार्य प्राप्त झाले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

