मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
कमलापूर:- एकल विद्यालय अभियान अंतर्गत आचार्य प्रशिक्षण अभ्यास वर्गाचे प्रशिक्षण दिनांक 16 ऑक्टोंबर 2022 ते 23 ऑक्टोबर 2022 पर्यंत कमलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गात लहान मुलांना आनंददायी पद्धतीने हसत खेळत शिक्षणनाचे धडे कसे द्यावे यासोबत ग्रामविकास आरोग्य जागरण संस्कार आदी विषयावर सुद्धा योग्य असे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गात कमलापूर जिमलगट्टा पेरमिली सिरोंचा आधी क्षेत्रातून 80 ते 85 आचार्य प्रशिक्षणाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर दुगीरालापाटी ( सच स.अध्यक्ष) श्री, हरीशजी पब्बावार (संच सह सचिव)
श्री, बकय्याजी चौधरी,( सदस्य ) श्रीमती विद्यादेवी येजुलवार (महिला समिती अध्यक्ष) अंचल टोली, संच टोली आणि आचार्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून आपले विचार मांडताना कुठल्याही क्षेत्रात शैक्षणिक सामाजिक राजकीय व्यावसायिक यासह अन्य क्षेत्रामध्ये विकसित व्हायचे असेल तर स्वतःचा आत्मविश्वास व परिश्रम यामुळेच आपले ध्येय उंच शिखरावर घाटू शकतो व स्वतःचा भरभर विकास करू शकतो असे प्रतिपादन श्रीधर दुग्गीरालापाटी यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348