सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- विजकीड कार्निवल, पुणे तर्फे सप्टेंबर 2022 फेज टू चॅलेंज घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत (वयोगट: 3 ते 15) शाळेची विद्यार्थिनी कु. महेक आफ्रीन अब्दुल रहमान वर्ग 10 हिला माॅय हॉबी वर चित्र रेखाटने आणि त्याची माहिती सांगणे याबाबतीत तिसरा क्रमांक प्राप्त झाला. तिला संस्थेतर्फे मेडल आणि गौरव प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. तसेच कु. राशी राहुल वेले, कु. रूपाली मनोज निमकर आणि कु. त्रिशाली पप्पू महानंद यांना कविता वाचन केल्याने गौरव प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्री. आर. के. वानखेडे यांनी स्वतःचे पैसे भरून स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले होते.
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या संस्थेतर्फे दिनांक: 09 ऑक्टोंबर पर्यंत माहिती मागविण्यात आलेली होती आणि याचा निकाल दि. 19 ऑक्टोंबर ला जाहीर करण्यात आलेला आहे. शाळेच्या ईमेल आयडीवर 22 रोजी ई- सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. तसेच विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र आणि मेडल 31 ऑक्टोंबर नंतर विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव डॉ. श्री. अशोकराव जीवतोडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. बी. भगत सर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र यांच्याकडून अभिनंदन केल्या जात आहे.