✒️प्रशांत जगताप
वर्धा:- केंद्र शासनाच्या पुरस्कृत दीनदयाळ अत्यादय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान वर्धा नगर पालिका अंतर्गत येणाऱ्या शहरी बेघराना निवारा देणाऱ्या वृध्दाश्रमात समता सैनिक दल या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वेटरचे वाटप करण्यात आले. समता सैनिक दलाच्या या अभिनव उपक्रमाचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे सर्वीकडे कौतुक करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अनेक गरीब अनाथ वृद्ध या थंडी पासून स्वतःचा बचाव करू शकत नाही. ही बाब समता सैनिक दलाच्या लक्षात घेऊन त्यांनी शहरी बेघराना निवारा देणाऱ्या वृध्दाश्रमात जाऊन आपली सामाजिक देणं आहे असा विचार करत वृध्दा आश्रम येथील राहणाऱ्या नागरिकांना स्वेटरचे वाटप केले. यावेळी समता सैनिक दलाच्या जवानांनी सर्व नागरिकांना असे आव्हान केली की, समाजातील सजग आणि दानशूर नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी निभावत अशा गरीब अनाथ वृद्ध नागरिकांना मदत करावी जेणे करून आपण अशा गरीब अनाथ वृद्ध नगरीच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो.
यावेळी वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचार प्रमुख अभय कुंभारे, मार्शल पवन थुल, वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तनिष्का थुल, संघर्षा थुल, रवी ढोबळे, सौरभ साहु आदीं उपस्थित होते.

