गोंडपिपरी तालुक्यातील भाजपाचे नेते अमरभाऊ बोडलावार यांच्या हस्ते झाले उदघाटन.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी:- युवकांचा उत्साह वाढविण्याकरिता दिवाळीच्या औचित्य साधून उत्साही यूवक मंडळाकडून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्या हस्ते करण्यात आला. सेवानिवृत्त जेष्ठ नागरीकांचे सत्कार अमर बोडलावार माजी जि.प.सदस्य, चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अमर भाऊंनी खेळाडूंना मार्गदर्शन केले, व सर्वांना शूभेच्छा दिल्या. तसेच सेवानिवृत्त सतकारमूर्तींचे यशस्वीरीतीने सेवा कार्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी सत्कारमूर्ती म्हणून WCL येथून सेवानिवृत्त झालेले देवराव मारोती मोरे, परिसरातील विद्यार्थांना शिक्षणाने भविष्य घडवणारे शिक्षक दिलीप म. मोरे, मदनराव खाडे जिल्हा परीषद, अनिल मोरे cdcc बॅंक, रामजी जूनघरे WCL, वसंतराव मोरे शिक्षक, लटारू झाडे WCL, मधुकरराव वानखेडे WCL यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष सत्कार म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सूनिल रामचंद्र सातपुते, शासकीय सेवेत रूजू झालेले सुरेंद्र बूटले, ईयत्ता 10 वीत प्रथम आलेली कु. आचल हरिदास टेकाम, 12 वीत प्रथम चि. तूषार आनंदराव रामटेके. यांचा सत्कार करून समाजासाठी सत्कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
यावेळेस मंचावर उपस्थीत असलेले दिगंबर मोरे माजी उपसरपंच, प्रकाशजी उत्तरवार, मदन खामनकर, संदिप बूक्कावार, भाऊराव नगरकर, अतुल बुकावर. दोरखंडे, मनोज गराडे व सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते.