सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- येथे काँग्रेस कमिटी तर्फे देशातील पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सदस्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती सांगितली. त्यांनी भारत देशासाठी केलेले योगदान आणि आज यांच्या कार्याने देश आज एका सूत्रात बांधून आहे. यावेळी हे विचार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य घनश्याम मूलचंदनी, शहर अध्यक्ष करीमभाई, महिला तालुका अध्यक्ष अफसना सय्यद, शहर महिला अध्यक्ष ऍड मेघा भाले, छाया शेंडे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश नक्कावार, माजी नगरसेवक राजू बहुरीया, रवी कोडपे, बाबूभाई, ऍड इनयात सय्यद, मेहबूब खान पठाण, हेमंत मानकर, स्नेहल बडघरे, प्राणेश अमराज दौलत बुंदेल सह अनेक कार्यकर्ते या वेळी हजर होते.
