कुणाल घोडके पुणे शहर प्रतिनिधी ..
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठांनी वाहन चोराया शोध घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्ह्यांना आळा बसावा म्हणुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिजीत जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की अमृत खान, लिपाणे वरती येथे रेकॉर्डवरील वाहन चोर शेखर चंद्रकांत चव्हाण हा चोरीची बुलेट दुचाकी गाडी घेवून थांबला आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंगलदार यांनी जामुळवाडी रोड, अमृत खान, लिपाणे चस्ती, पुणे येथे जावुन पाहता तेथे आरोपी शेखर चंद्रकांत चव्हाण, वय ३४ वर्षे, रा. मु. पो हरणी, ता. पुरंदर, जि. पुणे सध्या रा. श्रीनाथ टाऊन, फ्लॅट नंबर ३०६, लिपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड, अमृतसिटी पुणे हा बुलेट दुचाकी गाडी क्रमांक MH.12.QD. 4412 हीच्यासह थांबला असल्याचे दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवून गाडीबाबत तपास करता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंन ६९२ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची गाडी जप्त करून त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने जाणखीन ४ दुचाकी गाड्या निवेदन पंचनाम्याने फाडुन दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या असून त्याप्रमाणे खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि ६९८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे २. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि १३४२ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे ३. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि ९०२ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
४. शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि २६२ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे वरील प्रमाणे आरोपीताकडुन ५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन त्याचेकडुन २,००,०००/- रुपयांचे ५ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाई मा.सागर पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीर, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीरा अंगलदार रविद्र विमा, नरेंद्र महांगरे, विश्वनाथ घोणे, शैलेश साठे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सविन रारपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, नितेश चोरमले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

