✒️यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध महिला डॉक्टर सुरेखा बरलोटा व त्यांचे पती डॉ. पियूष बरलोटा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. सुरेखा बरलोटा या यवतमाळच्या प्रसिद्ध स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ होत्या. त्यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात सुरेखा बरलोटा आणि डॉ. पियूष बरलोटा या दोघांचा मृत्यू झाला.
यवतमाळ येथील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. पियूष बरलोटा आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुरेखा बरलोटा आणि त्यांच्या मित्राचं कुटुंब हैदराबाद येथून MH 29- BP- 4200 या आलिशान कराने यवतमाळला परत येत होते. त्यावेळी निर्मल या ठिकाणापासून काही अंतरावत टोल नाक्याजवळ त्यांच्या करचा टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. पियूष बरलोटा आणि डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी घेतली धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात हलवलं. त्यात पूजा पियूष बरलोटा वय 16 वर्ष, अतिथी वय 18 वर्ष आणि मीनल वय 40 वर्ष यांच्यावर निर्मल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर पियूष बरलोटा यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.
घटनेची माहिती मिळताच हैदराबाद डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. निर्मल येथील शासकीय रूग्णालयात डॉ. सुरेखा बरलोटा यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांचं पार्थिव यवतमाळमध्ये पोहचणार आहे.
यवतमाळकराच मन हेलावल.
प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य यांची भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी यवतमाळ येथे येतात सगळे हळहळले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348