Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 1, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल: खासदार डॉ. सुजय विखे पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- अहमदनगर-मनमाड रस्त्याच्या कामाची निविदा आठवड्याभरात निघेल. १ जानेवारीला रस्त्याचे काम सुरू होईल, मात्र आता पुन्हा कोणी या रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.

अहमदनगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत केंद्राच्या एका पथकाने आज पाहणी केली आहे. त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिंगवे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर खासदार डॉ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग नवी दिल्ली येथील अधिकारी एस. के. मिश्रा, आशिष आसाटी, पी. जी. खोडस्कर, अंशुमती श्रीवास्तव, प्रफुल्ल दिवाण, एम. एस. वाबळे, दीपेंद्र राठोड, दिग्विजय पाटणकर आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, अहमदनगर -मनमाड रस्त्याच्या कामासाठी पुढील आठवड्यात सुमारे ८०० कोटी रुपयांची निविदा निघणार आहे. रस्त्याच्या वरील खड्डे बुजविण्यासाठी ८ कोटी रुपये आणले आहेत. त्यानुसार कारपेटींगचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहे. कोणीही खासदार व लोकप्रतिनिधी स्वतः हून जाऊन रस्ता खराब करत नाही. तर उड्डाणपूल पूर्ण झाला नसता. बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्णत्वास आले नसते. ठेकेदार नेमणे खासदाराच्या हाती नसते. अहमदनगर-मनमाड रस्त्यामुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल मी जनतेची माफी मागतो. आम्ही केलेल्या कामाला ठेकेदारांकडून म्हणावी, तशी साथ मिळाली नाही. मात्र रस्त्याच्या कामाची निविदा पुढील आठवड्यात निघेल. नव्या ठेकेदाराकडून १ जानेवारीला रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.

नवीन ठेकेदार नेमण्याचा अधिकार ई टेंडरींग प्रमाणे शासनाला असतो. त्यामुळे साईबाबा चरणी एकच प्रार्थना करेल की या रस्त्याच्या कामाचा ठेकेदार जुनाच येऊ नये. नवीन ठेकेदार आल्यावर कोणी टक्केवारी मागण्याचा प्रयत्न केल्यास. मी पत्रकार परिषद घेऊन त्या लोकप्रतिनिधीचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्या शिवाय शांत राहणार नाही आसा इशारा त्यांनी केला त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात टक्केवारी मागण्याची जी प्रथा मागील काही वर्षांपासून सुरू होती, ती यापुढे होणार नाही. कारण जनतेचे होणारे नुकसान पुन्हा भरून येणार नाही.

नवीन ठेकेदार आल्यावर १ जानेवारी २०२४ पर्यंत रस्ता चांगला केला जाईल. याच निविदेनुसार रस्त्याच्या ७५ किलोमीटरपर्यंतच्या दुरुस्तीचेही काम घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते चांगले होत आहे. अहमदनगर जिल्हा विकासाकडे जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक धोरण ठेवल्यास जिल्ह्यात पुढील काळात निश्चित विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

करमाळा रस्त्यासाठी वाईटपणा.
नगर – करमाळा रस्त्याच्या कामाचा
वेग घेण्यासाठी काही धार्मिक स्थळांचे स्थलांतर करावे लागेल. त्यासाठीचा वाईटपणा घेत आहे. विकासासाठी वाईटपणा घेण्यास मी तयार आहे. त्याला कोणी धार्मिक, जातीयतेचे स्वरुप दिले तर त्याला मी महत्त्व देत नाही. कोणी रस्त्याच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याचा सामना करून रस्त्याचे काम वेगात पूर्ण केले जाईल, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous Post

गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” गुजरातला गेलेल्या प्रकल्प परत आणा, हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केला निषेध.

Next Post

हौस मजेसाठी वाहन चोरी करणा-या सराईताकडुन ५ दुचाकी वाहने जप्त

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हौस मजेसाठी वाहन चोरी करणा-या सराईताकडुन ५ दुचाकी वाहने जप्त

हौस मजेसाठी वाहन चोरी करणा-या सराईताकडुन ५ दुचाकी वाहने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In