प्रशांत जगताप, संपादक
मुंबई:- महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय चर्चा रंगत आहे. त्यात राज्यातील दोन शक्ती भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यावी असे अनेक नागरिकाच्या इच्छा आहे. त्याच बरोबर उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झाली असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आता ठाकरे गटातील बड्या नेत्याने या युतीवर प्रतिक्रिया देतानाच या युतीला फुल्ल सपोर्ट केला आहे. त्यामुळे ठाकरे- आंबेडकर यांची जवळीक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी फोन केल्याची चर्चा आहे. त्यावर ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकरांची स्वत:ची ताकद आहे. ही ताकद आणि शिवसेना एकत्र आल्यास महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी होऊ शकते, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेवर जातीयवादाचा ठपका मारला जातो. पण शिवसेनेचं हिंदुत्व आणि शिवसेनेचा विचार सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे. शिवसेनंचं हिंदुत्व मान्य आहे हीच प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे युती झाल्यास ही येणाऱ्या काळातील परिवर्तनाची नांदी ठरणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
स्वत: अंबादास दानवे यांनीही या युतीला पाठिंबा दर्शविणारं विधान केल्याने ठाकरे-आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रं दिसणार का? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. त्यामुळे ही युती झाल्यास त्याचा फायदा या दोन्ही नेत्यांना होणार आहे.
मुंबईतही वंचितची मोठी ताकद आहे. वंचित, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी झाल्यास महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही आघाडी होणरा का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी राजकारणाची कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झाली असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आता ठाकरे गटातील बड्या नेत्याने या युतीवर प्रतिक्रिया देतानाच या युतीला फुल्ल सपोर्ट केला आहे. त्यामुळे ठाकरे-आंबेडकर यांची जवळीक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.