✒️राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. निकाल अगोदरच तय होता. पण उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या किती मताने जिकणार याची उसुकाता सर्वांना लागली होती.
राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले होते. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत अपक्षांचा सुपडा साफ केला आहे. तसेच नोटाला दुसऱ्य़ा क्रमांकावर मते मिळाली आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत उमेदवारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल) आणि ‘ईव्हीएम’ याद्वारे मिळालेली एकत्रित अंतिम मते खालीलप्रमाणे :
१) श्रीमती ऋतुजा लटके: 66530
२) श्री. बाला नाडार : 1515
३) श्री. मनोज नायक : 900
४) श्रीमती नीना खेडेकर : 1531
५) श्रीमती फरहाना सय्यद : 1093
६) श्री. मिलिंद कांबळे : 624
७) श्री. राजेश त्रिपाठी : 1571
आणि
नोटा : 12806
एकूण मते : 86570
अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया
‘हा विजय माझा नाही तर माझ्या पतीचा आहे. मतदारांनी माझ्या पतीने जे काम केले त्यालाच लोकांनी आज प्रतिसाद दिला. या विजयाचा मी जल्लोष करणार नाही, मला खंत आहे की, पतीच्या निधनानंतर निवडणूक लढवली’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले.
राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे. ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी महाराष्ट्र संदेश न्यूज माध्यमांशी संवाद साधला.

