राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर,दि.8:- भंगाराम तळोधीतील 33KV विद्यूत उपकेंद्र पूर्णत्वास येत असून गोंडपिपरीतील विद्यूत उपकेंद्र कार्यालय भंगाराम तळोधीत स्थलांतरित करण्याबाबत नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना गोंडपिपरी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले.
माजी जिल्हा परीषद सदस्य अमर बोडलावार व स्वप्निल अनमूलवार यांनी नियोजन भवन येथे वन मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेवून गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे मोठी बाजारपेठ असून 10-15 गाव जोडून आहेत. शेतकरी व व्यापारी यांना विद्यूत सेवा मिळण्यासाठी अडचण निर्माण होत असून याचा परिणाम जनसामान्याला भोगाव लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी गोंडपिपरीतील विद्यूत उपकेंद्र कार्यालय भंगाराम तळोधीत स्थलांतरित करण्याबाबत नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्याकडून निवेदन देण्यात आले असून लवकरच भंगाराम तळोधीत कार्यालय आणण्यासाठी संबधित विभागाला सूचना केल्या.

