कवी: गिरीश जाधव, राह. पुणे
उतरत्या वयात मी येतो
संध्याकाळी तळयाकाटी फिरा़यला
कधी असते ती माझ्या सोबत
कधी नसते ती माझ्या सोबत
फक्त असतात तिच्या आठवणी
माझ्या मनात घर केलेल्या..
मावळणारया सांज धारेला, मावळुनं जावे लागते
आठवणी उराशी सोडुनं, तळ माञ एक साक्ष असते
युगलं प्रेमींचे,म्हतारंपणाने पिच्चालेल्या वार्द्यक्यातीलं आठवणींच्या रहस्यं कथेचे..
झाडाची पानं वाळुची रेती
पिवळसर रंगात मावळणारा तो रवी
संत पाण्याची काया आणि निरागसं तो ऋतु
गोड तुझं हसणं, माधुरयाचं लेणं..
मरणाच्या दारात
तु ही उभी, मी ही उभा
दोघांच्या आयुष्याची झालेली ती संध्याकाळ
मावळुनं कधी जावु आपले आपुल्याला समजणार नाही..
तळ आपली वाटं पाहिलं
आपण मात्र असणार नाही..
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
