कवी गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
काय लिहावे मी
आपल्या मैत्री बद्दल
मैत्री एक गुंतवणूक
जी देते भावनांचे व्याज मुद्दल
जपल्या भावना एकमेकांच्या
तर ती होते अधिक घट्ट
मैत्री खरंच मित्राजवळ
करते लहान मुलासारखा हट्ट
रागावते मैत्री कधी तर
कधी ती मनातून चिडते
मित्रांसाठी मैत्री खरी
या जगाशीही लढते
मैत्री म्हणजे जगण्यासाठी
प्रेरक असे न संपणारे बळ
समजून घ्यावी आपण
बस एकमेकांची तळमळ
धावून जाते मैत्री आपली
मित्र अडचणीत आपला दिसता
मित्रांसोबत दिवस जातो
गप्पा मारत बसता बसता
सोडू नये हात मैत्रीचा
जरी अडचणी असतील लाख
चुकूनही स्वार्थापायी आपण
करू नये मैत्रिभावनेची राख
कवी गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
मो.न.७०५७९०४६७७
९८३४३६१३६४