सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010
जालना:- सनवार व शुभप्रसंगी गोडधोड करण्याची परंपरा आहे. शिवाय पॅकिंग च्या मिठाईची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.आता पॅकिंग च्या मिठाईवर देखील संबंधित उत्पादकांना ही मिठाई किती दिवस चांगली राहु शकते, याची मुदत टाकावी लागणार आहे. नवी दिल्ली येथील अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने सर्व मिठाई विक्रेत्यांना आपल्या पॅकिंग च्या मालावर उत्पादनाची तारिख आणि मिठाई कीती दिवसापर्यंत खाल्ली जावु शकते म्हणजे बेस्ट बिफोर दिनांक नमुद करणं बंधनकारक करण्यात आले आहे. बेस्ट बिफोर नसल्यास संबंधित मिठाई उत्पादकावर कारवाई करण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासनाने कळवले आहे.
