युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
992329644
नागपूर:- जिल्हातील मोवाड येथील गंगाराम भगवान नगरपरीषद उच्च माध्यमिक शाळेतील १९९९ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा येथील पुरातन महादेव मंदीर देवस्थान जुनी वस्ती मोवाड येथे शाळेचे माजी प्राचार्य श्यामसुंदरजी पालीवाल सर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे
प्राचार्य डाॅ. किशोरजी झीलपे यांचे प्रमुख उपस्थीतीत तर शालेय माजी शिक्षक श्री. धर्मे गुरूजी यांचे प्रमुख मार्गदर्शनात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकमेकांपासुन दुरावलेले शाळेतील माजी मित्र मैत्रीणी पुन्हा एकत्र आल्याने सलग २३ वर्षांनी यावेळी जुन्या स्मृतींना उजाळा आल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आपसुक अश्रु तरळले. सदर स्नेहमीलन कार्यक्रमासाठी स्थानीक विद्यार्थ्यांनी महीनाभर परीश्रम घेउन कार्यक्रम यशस्वी घडऊन आणला. दिवसभर सुरु असलेल्या या स्नेहमीलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी विषद करून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रम बघायला परीसरातील निमंत्रीत मंडळींनीही आपली ऊपस्थीती दर्शविल्याने पुरातन महादेव मंदीराला जणु एका विशीष्ट सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्नेहमीलन कार्यक्रमाचे प्रयोजन आयोजन माजी विद्यार्थी जगदीश वाडबुध्ये, ओम माळोदे, योगेश काळाणे, लुमेश कळंबे, ऊमेश लहुळकर, राजु वरूडकर, प्रफुल्ल पुसदकर, देवेंद्र मानेकर, शशीकांत ऊज्जैनकर, कांताबाई बालपांडे व इतर सर्व मित्र मैत्रीणींनी मोठ्या प्रयत्नाने व सर्वांच्या सहकार्याने तसेच गुरूवर्यांच्या आशीर्वादाने स्नेहमीलन कार्यक्रम यशस्वी पार पडला.

