✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- महाराष्ट्रच्या शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे. राज्यात झालेल्या अती पावसामुळे अनेक शेतकराचे पिक वाहून गेले तरी काही भागात ओला दुष्काळ झाला असुन शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यात आता विजेचा लपंडाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सोयाबीन आणि इतर पीक तर पूर्णत्व गेले आहे. आता काही प्रमाणात आशा कापूस गहू चना याचवर आहे. त्यामुळे या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असून फक्त 4 दिवस दिवसाला व 3 दिवस रात्रीला ओलीत करू शकते करीता रात्रीला ओलीत करणे कठीण असून जंगली जनावर असून रोही, डुक्कर व अन्य प्राणी केव्हाही हमला करू शकतो. तरी या वर उपाय योजना करून शेतकराना रब्बी पिका करीता 24 तास विज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावी अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडीच्या वतीने जिल्हा अधिकारी वर्धा यांना देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे, जिवन उरकुडे, प्रदिप मानिकपूरे, प्रणय पाटील, प्रवीण मेश्राम, मायासिग टाक, सोपान कांबळे, चन्द्रप्रकाश जैस्वाल, किशोर बोरकर, अरूण मारूडकरा सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते होते.

