वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
पुणे,दि.१४ नोव्हे:- आद्यक्रांतीगुरू लहुजी( वस्ताद) साळवे यांच्या २२८ व्या जयंती औचित्याने ‘आद्यक्रांतीगुरू लहुजी( वस्ताद) यांचे समाधीस्थळ संगमवाडी येथे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, ( बार्टी) पुणे मार्फत ८५% सवलतीच्या दरात पुस्तक विक्री स्टाॅल, बार्टी व समाजकल्याण योजना- उपक्रमांचे स्टाॅल, जनसामान्यांसाठी अल्पोपहार स्टाॅल यांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार (निबंधक, बार्टी), श्री. उमेश सोनावणे (उपायुक्त तथा विभाग प्रमुख- योजना विभाग बार्टी), श्री. सचिन जगदाळे (कार्यालयीन अधिक्षक विस्तार व सेवा विभाग, बार्टी) यांच्या हस्ते समाधीस्थळी लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार (निबंधक, बार्टी), श्री. उमेश सोनावणे (उपायुक्त तथा विभाग प्रमुख- योजना विभाग बार्टी) श्री.विजय गव्हाणे (आमदार) तसेच श्री. अमित गोरखे (अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ) यांचे हस्ते करण्यात आले. श्री. अशोक लोखंडे (अध्यक्ष आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती) यांनी पुस्तक स्टाॅल व योजना स्टाॅल, फुड स्टाॅल आयोजनाबद्दल बार्टीचे विशेष आभार व्यक्त केले. याप्रसंगी बार्टी मुख्यालयाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.हनवते, सहा. प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, श्री. रामदास लोखंडे तसेच प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा,टीम पुणे जिल्हा समतादूत, उपस्थित होते.
पुणे जिल्हा समतादूत यांचेमार्फत आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा -चालता बोलता कार्यक्रम घेण्यात आले. योजना स्टाॅलचा माध्यमातून बार्टीचा योजना व उपक्रमांची माहिती जन सामान्यांना देण्यात आली. श्रीमती सुनीताताई वाडेकर(उपमहापौर,पुणे मनपा), श्रीमती संगीता डावखर ( सहा. आयुक्त, समाजकल्याण पुणे) यांनी बार्टीचा योजना व पुस्तक विक्री स्टाॅल यांस सदिच्छाभेट दिली. विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व जनसामान्यांनी पुस्तक विक्री स्टाॅल व योजना स्टाॅलला भेट दिली. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम पुणे जिल्हा समतादूत, प्रकाशन विभाग टीम, छायाचित्रकार, बार्टीचे सुरक्षा रक्षक, वाहन चालक व स्थानिक संघटना इ. सर्वांचे सहकार्य लाभले.

