सौ. हनिषा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
राजुरा:- “बुद्ध भूमी राजुरा” येथे “भारतीय बोैद्ध महासभा, राजुराच्या वतीने पहिल्यांदाच “वर्षावास धम्मप्रवचन ” मालिकाकेला दी.30 शनिवार पासून सुरवात करण्यात आली.
भा.बो.महा. केंद्रीय शिक्षिका आयु. समताताई लाभणे, आयु. कुष्णंक पेरकावार केंद्रीय शिक्षक, यंग मेन्स बुध्दिस्ट वेलफेअर असोशियानचे अध्यक्ष आयु. चरणदास नगराळे, भा. बो. महा. सभा. अध्यक्ष आयु. धरमू नगराळे, सरचिटणीस आयु.गौतम चौरे, अध्यक्षा आयु. मेघाताई बोरकर, सुजाता नळे, किरण खैरे व इतर उपासक व उपाशीका यांचा हस्ते तथागत गौतम बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रजलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.या “वर्षावास धम्म प्रवचन व गुरुपौर्णिमा ” या विषयावर अतिशय सुंदर सविस्तर पणे मार्गदर्शन समताताई लाभणे व कुष्णक पेरकावार सरांनी केले.
राजुरा तालुक्यामध्ये सम्यक बुद्ध विहार सोमनाथपूर राजुरा, बुद्ध भूमी राजुरा, लुंबिनी बुद्ध विहार बामण वाडा, समता समाज मंडळ रामपूर येथील बौद्ध उपासक व उपाशीका उपस्थित होते. या ठिकाणी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे उद््घाटन आद. धर्मुजी नगराळे यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात संचालन आयु. भीमराव खोब्रागडे तर आभार प्रदर्शन आयु. गौतम चौरे यांनी केले. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.