श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पतीने गोळ्या खायला देऊन पत्नीचा इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू सासन्यावर संमतीशिवाय गर्भपात व कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचिता ऋषीकेश नागरगोजे (रा. गजानन विहार, कालिकानगर, बीड) असं पीडित विवाहितेचं नाव आहे. विशेष म्हणजे, ’10 लाख रुपये हुंडा घेवून ये अशी मागणी करतं बेल्टने मारहाण करून हुंड्यासाठी छळ केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात हा सगळा प्रकार घडल्याने हुंड्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
12 मे 2019 रोजी सुचिताचां विवाह ऋषीकेश नागरगोजेशी झाला. ऋषीकेश हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी आहे. सासरा भागवत दशरथ नागरगोजे जिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी असून सासू अनिता भागवत नागरगोजे शिरूर तालुक्यात जि.प. शाळेत शिक्षिका आहे.
लग्नात सुचिताच्या आई-वडिलांनी 6 लाख 17 हजार 199 रुपयांचे 19 तोळे दागिने आणि संसारोपयोगी साहित्य दिले होते. सुचिता गर्भवती झाल्याचे कळाल्यावर ऋषीकेशने दवाखान्यात नेले नाही. सतत दीड महिना त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खायला दिल्या. रक्तस्राव वाढला. त्यानतंर तिचा एका खासगी रूग्णालयात गर्भपात केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादी वरून पती आणि सासू-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

