Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बालपण हरवलेल्या विधी संघर्षित बालकांसाठी ‘संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन’ ठरत आहे आशेचा किरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बालपण हरवलेल्या विधी संघर्षित बालकांसाठी ‘संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन’ ठरत आहे आशेचा किरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी, दि.२१:- कोवळ्या वयात नकळत हातुन झालेल्या चुका.. चार भींतीच्या आत कोंडलेले हसण्या बागडण्याचे दिवस.. परिणामी नैराशेच्या गर्तेत अडकलेले बालपण.. अशा बालपण हरवलेल्या विधी संघर्षित बालकांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील संदेश बोर्डे स्पोटर्स फाउंडेशन आशेचा किरण ठरत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, (निरीक्षण गृह व विशेष गृह) येरवडा, पुणे येथील ०९ बालकांची निवड नागपुरला होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत झाली असुन या संधीमुळे अशा बालकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.

संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे विधी संघर्षित मुलांना योग्य मार्गदर्शन व क्रिडा क्षेत्रातील विविध खेळांची आवड निर्माण करुन त्यांना नवीन आयुष्य जगण्यासाठी मोलाचं योगदान करीत आहे. निवडक झालेल्या ०९ मुलांना घेऊन संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन चे प्रशिक्षक संदेश बोर्डे हे नागपुर येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी सोमवार (ता.१४) रोजी नागपुरला रवाना झाले होते व आज ते परतले.

‘झुंड‘ चित्रपट हा ज्या व्यक्तिरेखेच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात आला आहे. असे प्रा. विजय बारसे यांनी १९ मार्च २०२२ रोजी या विधी संघर्षित बालकांची येरवडा निरीक्षण गृह येथे भेट घेतली होती. त्यावेळी प्रा. बारसे यांनी या बालकांशी संवाद साधत अतिशय सुंदर मार्गदर्शन केले होते. जो कोणी फुटबॉल खेळात उत्तम कामगिरी करणार आहे. अशा मुलांना आम्ही नागपुर येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची व स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणार आहोत. असा शब्द दिल्यानंतर मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.

स्वतःवरील कलंक पुसुन समाजापुढे पुन्हा ताठ मानेने उभे राहण्यासाठी संधी प्रा. बारसे यांनी मुलांना उपलब्ध करुन दिल्यानंतर मुलांनी मैदानावर लक्ष केंद्रीत केले. त्यामधुन उत्तम ०९ मुलांची खेळाडु म्हणुन निवड करण्यात आली आहे.

संदेश बोर्डे स्पोर्ट फाऊंडेशनचे प्रशिक्षक संदेश बोर्डे हे मुलांसाठी अथक परिश्रम घेत आहेत. या मुलांसाठी आपल्या कामाच्या व्यापातुन वेळ काढत दर शनिवार आणि रविवार निरीक्षणगृहात जावुन या विधी संघर्षित मुलांना प्रशिक्षण देत आहेत. बोर्डे यांनी ०९ उत्तम खेळाडु तयार केले आहेत. निवडलेल्या मुलांना घेऊन ते सोमवार (ता.१४) रोजी नागपुर या ठिकाणी गेले होते व ते आज परतले. मुलांचा उत्साह पाहुन अशा मुलांसाठी नव नवीन वाटा तयार करण्याचा ध्यास बाल दिनानिमित्त संदेश बोर्डे स्पोर्टस फाऊंडेशनने घेतला आहे. विशेष म्हणजे ९ पैकी ३ मुलांचे राष्ट्रीय लीडरशिप प्रोग्राम साठी नागपूर येथे निवड देखील झाली. मुले परतल्या मुळे त्यांच्यात एक नवी ऊर्जा दिसून येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

हडपसर तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी दिल्लीतून अटक

Next Post

बीडमधील संतापजनक घटना दहा लाखांसाठी विवाहितेचा केला बळजबरीने गर्भपात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीडमधील संतापजनक घटना दहा लाखांसाठी विवाहितेचा केला बळजबरीने गर्भपात

बीडमधील संतापजनक घटना दहा लाखांसाठी विवाहितेचा केला बळजबरीने गर्भपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In