पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट 2 पुणे शहर
पुणे : आज रोजी सपोनि वैशाली भोसले ,व युनिट 2 कडील स्टाफ असे भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ७८०/२०२२ भादवि कलम *३०२* ३६४ ३८८ , ३४१ , ३२३ , ३४ या दाखल गुन्हयाचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेत असताना *पो हवा मोकाशी व पो हवा उत्तम तारु* यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , वरील गुन्हयातील आरोपी हा हिरामन बनकर शाळा बिबवेवाडी सुखसागरनगर कात्रज पुणे येथे थांबला असुन त्यांने अंगात काळ्या रंगाचे जन व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ची माहिती युनिट २ चा प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक संदिप भोसले (अतिरिक्त कार्यभार ) यांना कळविली असता त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले . त्यानंतर वरील अधिकारी व स्टाफ यांचेसह मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी करीत असताना वरील वर्णनाचे कपडे घातलेला इसम हिरामन बनकर शाळा बिबवेवाडी सुखसागरनगर येथे थांबलेला दिसला त्यास वरील स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे *लहु जनार्दन माने वय ४० वर्ष रा सुखसागर नगर कात्रज पुणे ४६* असे असल्याचे सांगीतले त्याचे दाखल गुन्हयाबाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास युनिट २ कार्यालयात घेवुन येवुन त्यास विश्वासात घेवुन अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशिर कारवाई कामी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे
**सदर हा यापूर्वीचा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचे विरुद्ध अग्निशस्त्र बाळगणे , शरीराविरुद्ध चे गंभीर गुन्हे दाखल आहेत*
*
सदरची कामगिरी
माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे. पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2 चे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक. संदीप भोसले (अतिरिक्त कार्यभार )यांचे मार्गदर्शनाखाली , युनिट-2 चे सपोनि वैशाली भोसले पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, मोहसीन शेख, संजय जाधव, साधना ताम्हाणे ,विनोद चव्हाण, उत्तम तारू, विजय पवार, प्रमोद कोकणे, गणेश थोरात, गजानन सोनुने, कादिर शेख, समीर पटेल, निखिल जाधव, नागनाथ राख यांचे पथकाने केली आहे.